Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुंबई : एकतर्फी प्रेमातून खोडसाळपणा; सिद्धीविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी

Share

मुंबई | प्रतिनिधी 

मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले सिद्धिविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण मुंबईत खळबळ निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी जेव्हा या घटनेचा अधिक तपास केला तेव्हा हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असल्याचे समोर आले.

अधिक माहिती अशी की, ठाण्यातील विवियाना मॉलच्या शौचालयात सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याचा संदेश लिहिण्यात आला होता. ‘गज्वा-ए-हिंद, दादर सिद्धिविनायक मंदिर बूम. इसिस इज कमिंग, स्लीपर सेल इज अॅक्टिव्हेटेड’, असा संदेश आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.

या संदेशासह याठिकाणी दोन फोन नंबर होते. या मोबाईलवर संपर्क केला असता एका मुलीचा हा नंबर असल्याचे समोर आले. दरम्यान, तिच्या आधीच्या प्रियकराने हे कृत्य केले असावे असा संशय या मुलीला आला.

यानंतर ठाणे पोलिसांनी या कथित प्रियकरास ताब्यात घेतले. हा तरूण विक्रोळीचा असून, एकतर्फी प्रेमातून आपणच हा खोडसाळपणा केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, या घटनेचा तपास सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!