अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नुकताच 10 वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला आहे. निकाल लागल्यानंतर अनेक पालकांची व विद्यार्थ्यांसाठी 11 वी प्रवेश मिळविण्याची लगबग अनेक कनिष्ठ महाविद्यालयात सुरु झाली आहे. उत्तीर्णी झालेल्या विद्यार्थ्यांना दि. 24 जून रोजी शाळेत गुणपत्रिका व कल चाचणीचा अहवाल मिळणार आहे.
जिल्ह्यातील 302 नियमित महाविद्याल असून 94 स्वयंम अर्थशासीत व शहरात 34 महाविद्यालयात आहे. या सर्व महाविद्यालयात एकाच वेळी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत जिल्हयातील 76 हजार 432 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यातील 67 हजार 470 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी 78 हजार पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तीर्णी झालेल्या 67 हजार 470 विद्यार्थ्यांना सहज प्रवेश घेता येणार आहेत. शहरातील 34 कनिष्ठ महाविद्यालयात 9 हजार 920 जागा अकरावी प्रवेश साठी उपलब्ध आहे.
नगर तालुक्यात 17 कनिष्ठ महाविद्यालय असून 1 हजार 920 प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यातील विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत तसेच अनेक कनिष्ठ महाविद्यालयात व्यवसायिक अभ्यासक्रम सुरु असल्याने या सर्व ठिकाणी एकाच वेळी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. शहरातील अनेक महाविद्यालयाने 11 वी चे प्रवेश अर्ज हे ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध केले असून ऑनलाईन स्वरूपात हे प्रवेश अर्ज भरून ते महाविद्यालयात जमा करावे लागणार आहे.
तर काही महाविद्यालयात ऑफ लाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रशासनाने जिल्ह्यात एकाच वेळी प्रवेश प्रक्रिया राबविणार असल्याने अनेक विद्यार्थी व पालक यांना अकरावी प्रवेशासाठी धावधाव करण्याची वेळ यंदा येणार नाही. यंदा 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नियमित विद्यार्थ्यांना तसेच ज्या विद्यार्थ्यांना ए.टी.के.टि. लाभली आहे. त्या विद्यार्थ्यांना सुध्दा या प्रवेश प्रक्रिये मध्ये भाग घेता येणार आहे.

19 जून ः प्रवेश अर्जचे वाटप
24 ते 29 जून ः अर्जाची स्विकृती व छाननी
30 जून ः प्रवेश अर्ज जमा केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी
1 जुलै ः प्राथमिक गुणवत्ता यादीवर आक्षेप
1 जुलै ः अंतिम गुणवत्ता यादी
3 ते 5 जुलै ः गुणवत्ता यादीप्रमाणे प्रवेश
6 जुलै ः प्रतिक्षा यादी क्र.1 जाहीर
6 ते 7 जुलै ः प्रतिक्षा यादी क्र. नुसार प्रवेश
8 जुलै ः प्रतिक्षा यादी 2 जाहीर
8 ते 10 ः जुलै प्रतिक्षा यादी 2 नुसार प्रवेश
11 जुलै ः प्रतिक्षा यादी 3 जाहीर
11 ते 12 जुलै ः प्रतिक्षा यादी 3 नुसार प्रवेश
13 ते 15 जुलै ः विनाअनुदानित तुकड्यांची यादी व प्रवेश

विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा यंदा विज्ञान शाखेकडे मोठा कल असल्याचे दिसून येत आहे. जिल्हयात 24 हजार 360 जागा या अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध आहे. शहरातील काही नांमकित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक काही कनिष्ठ महाविद्यालयात गर्दी करू लागले आहे. 

 

LEAVE A REPLY

*