Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोनाचे संकट टळेपर्यंत राहाता येथे अन्नाची पाकीटे घरपोहच

Share

राहाता (प्रतिनिधी) – कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत गरीब, परप्रांतीय कामगार तसेच रस्त्यावरील भिकारी यांची उपासमार होऊ नये यासाठी रोज एक हजार जनांना अन्नाची पाकीटे घरपोहच देण्याचे काम साकुरी येथील उद्योजक प्रफुल पिपाडा मित्रमंडळ करत असून त्यांच्या कार्याचे प्रशासनाने कौतूक केले आहे.

रोज राहाता व साकुरी येथील एक हजार जणांना घरपोहच अन्नाची पाकीटे दिली जात असून यात पुरी, भाजी, भात याचा समावेश असतो. आज गुढी पाडव्याच्या सनासाठी मसाला भात, पुरी, मटकी असे जेवण देण्यात आले त्यामुळे बंद व कर्प्यूमुळे नागरीकांची उपासमार टळणार आहे. जोपर्यंत हे संकट टळत नाही तोपर्यंत हा उपक्रम सुरू राहनार असल्याचे पिपाडा यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी ़सचिन अग्रवाल, अजित धाडीवाल, राजेंद्र वाबळे, राजूशेठ भनसाळी, पप्पू जाधव, प्रविन डुंगरवाल, दिलीप खरात हरीदास गायकवाड, नंदकुमार डुंगरवाल, दिपक सापीके , निखील वाबळे या मित्र परीवाराचे मोठे सहकार्य लाभत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!