Video : नाशिकची खाद्यसंस्कृती : सायंताराचा कुरकुरीत साबुदाणा व बटाटावडा

0
नाशिक (विद्या भोकरे)| धार्मिक वारसा लाभलेल्या नाशिकने खाद्यसंस्कृतीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली दिसून येते आहे. नाशिकच्या प्रसिद्ध मिस्सळसोबतच उपवासाच्या दिवशी ज्या ठिकाणी लांबच लांब रंग लागते ते ठिकाण म्हणजे सायंतारा होय.

खवय्यांच्या खवय्येगिरीला चालना देण्याचं काम नाशिकमधील बरीच विशेष अशी नावाजलेली खाद्य पदार्थांची दुकाने आजही शहराच्या कानाकोपऱ्यात दिसून येतात. नानाविध पाश्यात्य संस्कृतीची अनेक खाद्यपदार्थ नाशिकमध्ये दाखल झाली असतांनादेखील नाशिककर आवडीने याठिकाणी रांगेत उभे राहतांना दिसतात.

जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी सायंताराचा वडा झालाच पाहिजे असे म्हणत अनेकजण उपवासाचे औचित्य साधत याठिकाणी आवर्जून भेट देतात.

सायंताराबाबत सांगायचे झाले तर हे दुकान नाशकात जवळपास ५० वर्षांपासून खवय्यांसाठी सेवा देत आहे. या दुकानाची सुरुवात केली ती रमणलाल भाऊ यांनी. तेव्हापासून आजतागायत तमाम नाशिकरांना भाऊंनी चवीच्या प्रेमात पाडले आहे.

नाशिकमध्ये नियमित कुठल्या ना कुठल्या कारणास्तव वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पर्यटकांची मांदियाळी असते. येथे येणाऱ्या प्रत्येकालाच सायंताराचा वडा खाण्याची इच्छा होते. त्यामुळे सीबीएस, शालीमार, मेनरोड, गंगेवर राहणारे अनेकजण सांगतात की, दररोज कुणी ना कुणी सायंतारा हॉटेलबाबत विचारत असतात.

साबुदाणा वडा, उपवासाचा बटाटा वडा एवढे दोनच पदार्थ याठिकाणी मिळतात. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला रांगेततून यावे लागते…आधी पैसे देऊन कुपन घ्यायचे नंतर कुपन देऊन आपल्या आवडीचा पदार्थ घ्यायचा…अशी येथील कार्यपद्धती आहे. सतत होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी अशी शक्कल लढवली असे भाऊ आवर्जून सांगतात.

 

LEAVE A REPLY

*