Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पावसामुळे ऐन नवरात्रीत फुलांचे नुकसान; भाव वाढण्याची शक्यता

Share

नाशिक | शिवानी लोहगावकर

पितृपक्षात फुलांची मागणी अचानक घटल्यामुळे अनेक ;फुलांचा बाजार घटला होता.  मात्र, नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या फुलबाजारासाठी पुन्हा एकदा बाजार सज्ज झाला असून पावसाच्या हाहाकाराने अनेक शेतकऱ्यांच्या फुलांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत फुलबाजार भाव खाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नवरात्राच्या पार्श्वभूमीवर झेंडू , शेवंती , बिजली , मखमल , आणि गुलाब या फुलांना मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते. मात्र, या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि ऐन नवरात्राच्या तोंडावर झालेला पाऊस यामुळे जिल्ह्यातील फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . आणि नवरात्रोत्सवाच्या काळात या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे फुलांचे भाव वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातुन वेगवेगळ्या शहरात फुले निर्यात होतात. मात्र, यावर्षी पावसामुळे फुलांचे नुकसान झाल्यामुळे उत्पन्न घटले आहे. यामुळे बाहेरून फुलांची आयात होण्याची शक्यता असून यामुळे फुलांचे दर वाढणार आहेत.

फुल शेतीतून उत्पन्न निघायला सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागत असतो. नवरात्री आणि दसऱ्याच्या वेळी फुले बाजारात आणता येतील अशा नियोजनाने अनेक शेतकरी फुलांची लागवड करतात. मात्र, यंदा अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. फुलांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. यामुळे फुलांची कमतरता बाजारात जाणवण्याची शक्यता आहे.


शोभेच्या फुलांमुळे बाजार घटला 

बाजारात फुलांचे भाव वाढले तरी शेतकऱ्यांना हवे तसे भाव मिळत नाहीत. पावसामुळे आधीच नुकसान झाले आणि भाव मिळत नाही. बाजारातील प्लास्टिकच्या फुलांमुळे बाजारातील खऱ्या फुलांच्या मागणीत घट झाली आहे . प्लास्टिक बंदी प्रमाणेच प्लॅस्टिकच्या फुलांची देखील विक्री बंद करावी त्यामुळे फुलांना योग्य भाव मिळेल व शेतकऱ्यांना योग्य उत्पन्न मिळेल.

राहुल मौले ( फुल उत्पादक – मोहाडी , दिंडोरी )


पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पन्नात घट झाली आहे. त्यात निर्यात खर्च देखील निघत नसल्याने नुकसान होते . सणाच्या काळात भाव मिळाल्यास योग्य मोठ्या बाजारपेठेत फुले विक्री करता येतील.

देवराम मालुतकर ( फुल उत्पादक – तळेगांव , त्र्यंबकेश्वर )

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!