Type to search

Featured नाशिक फोटोगॅलरी

Photo Gallery : नाशिकचा पूर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची तीव्रता अधिक असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील धरणे भरली आहेत. अजून पावसाळ्याचा महिना असल्यामुळे प्रसंगावधान राखत धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे सोमवारी शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले असून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. गोदावरी नदीवरील अहिल्यादेवी होळकर पूल वगळता सर्व पूल पाण्यात बुडाले आहेत.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरातील सर्वच शेती पाण्याखाली गेली आहे. तर अशीच काही परिस्थिती गोदावरी नदीकाठी निर्माण झाली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!