Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

औद्योगिक वसाहतीमध्ये शिरले पुराचे पाणी

Share

सातपूर | प्रतिनिधी

सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याचे निचरा होण्यासाठी नैसर्गिक व्यवस्था नसल्याने अनेक कारखान्यांच्या उत्पादन क्षेत्रात पावसाचे पाणी शिरले परिणामी उत्पादन प्रक्रिया पूर्ण थंडावली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारखान्यांमध्ये पाणी असून नालेसफाई पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्थापन याबाबत प्रशासनाच्या कामकाजाची ढिसाळ नियोजन दिसून आले.

सातपूर औद्योगिक वसाहतीत अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून आहे. या पाण्याला वाहून जाण्याचा मार्ग प्रशासनाने बनवलेलं असल्याने सिएट कंपनी, कार्बन नाका, ज्योती स्ट्रक्चर चौफुली, मायको सर्कल, महिंद्रा सर्कल अशा विविध चौकांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे.

परिसरातील कामगार नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी असलेले आहे. पॅनल पासून वसाहतीच्या दरम्यान पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचून ते घरात शिरले त्यामुळे परिसरातील रो हाऊसेस बंगले पाण्याखाली गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

सातपूर भागातील नदीकिनाऱ्यावर असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी शिरले भिमवाडी, कांबळेवाडी, महादेववाडी या झोपडपट्ट्यांमध्ये नदीचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपळगाव बहुला परिसरात नासर्डी नदी लगतच्या भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तिरडशेत गावाचा संपर्क नाचणीच्या पुरामुळे तुटला आहे या गावाला जोडला जाणारा पूल पाण्याखाली आहे.

आनंदवल्ली परिसरातील बजरंग नगर शिवनगर भागाचा नदीचे पाणी शिरल्याने लोकांना विस्थापित करण्यात आले. आसाराम बापू आश्रम व परिसरातील वसाहती पाण्याखाली गेले आहेत. या ठिकाणी राहत असलेल्या लोकांनी तातडीने आपल्याला सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्याने धोका टळलेला आहे.

नवसाला पावणाऱ्या नवश्या गणपतीचे मंदिर पाण्याखाली गेली असून गणरायाच्या मूर्ती लाही गोदावरीने जलाभिषेक करून पाण्याने झाकले आहे. मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्ष राजीव जाधव यांनी चँँरिटी कमिशनर विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दानपेटी व इतर साहित्य तातडीने हलवल्याने मंदिराचे नुकसान झालेले नाही. सोमेश्वर मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब लांबे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून नदीपात्रापासून दुर राहण्याची विनंती केली

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!