Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सेल्फी

फ्लिपकार्टचे लवकरच क्रेडीट कार्ड; खरेदीवर मिळणार ५ टक्के कॅशबॅक

Share

मुंबई | प्रतिनिधी

फ्लिपकार्ट आता अ‍ॅक्सिस बँक आणि मास्टरकार्ड यांच्या मदतीने लवकरच एक अनोखे क्रेडीट कार्ड लाँच करते आहे. फ्लिपकार्टच्या नव्या क्रेडिट कार्डमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅकसोबतच अनेक फायदे ग्राहकांना होतील असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

फ्लिपकार्टकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकाला नव्या कार्डासाठी नोंदणी शुल्क म्हणून ५०० रुपये द्यावे लागणार आहेत. जर वर्षाला दोन लाखांपर्यंत खरेदी केलेली असेल तर त्यास हे कार्ड मोफत मिळेल. तसेच दर महिन्याला ग्राहकांना कॅशबॅक ऑटो क्रेडीटद्वारे थेट खात्यात पैसे मिळतील.

फ्लिपकार्ट-अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे कंपनीचे को-ब्रँड मर्चंट फ्लिपकार्ट, मंत्रा आणि 2 गुड इथून सामान खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल.

फ्लिपकार्ट-अ‍ॅक्सिस बँक यांनी थर्ड पार्टी मर्चंटसोबतदेखील भागीदारी केली असून यात मेक माय ट्रीप, उबर, पीव्हीआर, अर्बन क्लाप, क्युअरफिट इथून जर खरेदी केली तर ग्राहकाला 4 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. इतर सर्व मर्चंटच्या खरेदीवर कार्डहोल्डरला 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

शिवाय या क्रेडिट कार्डावर स्वागतपर बेनिफिट म्हणून ग्राहकांना को-ब्रँडेड मर्चंट्स आणि थर्ड पार्टी प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. यात ग्राहकाला तीन हजारापर्यंत फायदा होऊ शकतो. तसेच देशभरातील हॉटेल्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!