Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

फ्लिपकार्ट-अॅमेझॉनमध्ये 1 लाखांहून अधिक नोकऱ्या ?

Share

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील अॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या बड्या कंपन्यांमध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे. दिवाळीत ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तर्ता करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांकडून तब्बल १ लाख २० हजार नव्या तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध केल्या जाऊ शकतात. नोकरदार कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यंदा सणासुदीच्या काळात उपलब्ध होणाऱ्या तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

दिवाळीत ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तर्ता करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांकडून तब्बल 1 लाख 20 हजार नव्या तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध केल्या जाऊ शकतात. नोकरदार कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सणासुदीच्या काळात उपलब्ध होणाऱ्या तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होऊ शकते असेही काहींनी म्हटले आहे. यंदा खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने  खास ऑफर्ससोबतच लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी सेवेतही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी फौज तयार करण्यावर कंपनीने भर दिला आहे. फ्लिपकार्टनंतर अॅमेझॉननेही आता ग्राहक सुविधेवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!