नाशिकमधल्या विमानसेवेला १५ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक मंत्रालयाकडून खासदार हेमंत गोडसे यांना पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेले नाशिकचे विमान आता पुढच्या महिन्यापासून उड्डाण करणार आहे.

केंद्र सरकारकडून ‘उडाण’ या प्रादेशिक विमानसेवा योजनेअंतर्गत देशात हवाई सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या महिन्यात शिर्डी विमानसेवेला प्रारंभ झाला होता. त्यानंतर आता नाशिकची विमानसेवाही सुरु होणार असल्यामुळे नाशिक हवाई सेवेने जोडले जाणार आहे.

मुंबई विमानतळावर एअर स्लॉट उपलब्ध होत नसल्याचे कारण याआधी देण्यात येत होते. अखेर खा. गोडसे यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाबाहेर आंदोलनदेखील केले होते. त्यावेळी १५ डिसेंबरपर्यंत नाशिकमधून हवाई सेवेला प्रारंभ केला जाईल असे आश्वासन यावेळी गोडसेंना देण्यात आले आहोते.

त्यांनंतर मुंबईत हवाई संस्थांची महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात मुंबईतून नाशिकला विमानसेवेचा वेळ उपलब्ध करून देण्याबाबत निश्चिती झाली होती.

त्यानंतर १५ डिसेंबरपासून नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे या विमानसेवाना प्रारंभ होईल असे लेखी पत्र मंत्रालयाच्या सहसचिव उषा पढी यांनी खासदार गोडसे यांना दिले आहे.

स्पाईस जेटदेखील नाशिक बंगलोर आणि नाशिक दिल्ली सेवेसाठी उत्सुक : स्पाईस जेटदेखील नाशिक बंगलोर आणि नाशिक दिल्ली सेवेसाठी उत्सुक असून याबाबत अनमान रक्कम भरण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच ५ जानेवारीपासून ही सेवा नाशिकहून सुरु केली जाणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली असल्यामुळे नाशिककरांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

LEAVE A REPLY

*