Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकहून दिल्लीसाठी लवकरच उड्डाण; कार्गो सेवाही होणार पूर्ववत

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या ओझर विमानतळावर नाईट लॅण्डिंगची सूविधा सरु करण्यास हिरवा कंदील मिळाल्याने लवकरच विमानतळ विविध शहरांना जोडला जाणार असून, अनेक शहरांच्या प्रलंबीत सेवा यामुळे गतीमान होणे शक्य होणार असल्याने नागरीकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

नाशिक शहरातून सूरूवातील दिल्ली त्यापाठोपाठ हैद्राबाद व अहमदाबाद विमान सेवा सूरू करण्यात आली. मद्यंतरी दिल्ली सेवा बंद पडल्यानंतर नुकतीच एअर इंडीयाने ही सेवा सूरू करण्याच्या दृष्टीने तयारी सूरू कलेली असून, त्यासांठी लागणार्‍या सेवा सुविधा विमान तळावर दाखलही झाल्या आहेत.

तर स्टेशन मॅनेजरही हजर करण्यात आला असून फक्त शुभारंभाची तारीख जाहीर करणे बाकी असल्याने एअर इंडीयाद्वारे दिल्लीच्या सेवेला लवकरच प्रारंभ होणार आहे.

नाईट लॅण्डींग सूविधा सूरू होण्यासाठी प्रलंबीत असलेल्या स्पाईक जेटच्या गोवा व हैद्राबादसेवा लवकर सूरू होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच इंडीगो कंपनीच्या बंगळूरु, भोपाळ व हिंदण शहरांची सेवाही त्यामुळे सूरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. एअर अलायन्सद्वारे नाशिक-पूणे विमानसेवा सूरू करण्याबाबतही प्रंयत्न गतिमान करण्यात आले असल्याचे निमाच्या वतीने मनिष रावल यांनी सांगितले.

कार्गो सेवा लवकरच

खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून स्पाईक जेट विमान कंपनीसोबत संपर्क साधून नाशिकला कार्गो सेवा सूरू करण्याबाबत स्पाईक जेट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी चर्चा करुन आग्रही भूमिका धरली होती. या मागणीला त्यांनीेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच कार्गोसेवा सूरू करण्यासाठीच्या काही अडणी सोडविण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा करुन यावर मार्ग काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

ही सेवा सुरु झाल्यास मुंबईतील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल व या भागातून मुंबईला जाणारा कार्गोसेवेचा माल नाशिकमधूनच लोडींग करणे सोपे होणार असल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!