लॉकडाऊननंतर विमान प्रवासासाठी लागणार मेडिकल सर्टिफिकेट

jalgaon-digital
1 Min Read

सार्वमत

नवी दिल्ली – कोरोनामुळे देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच रेल्वे किंवा हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय केंद्राकडून घेण्यात आलेला नाही आहे. दरम्यान जर लॉकडाऊन नंतर विमानसेवा सुरू झाली तरीही, प्रवाशांना प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट दाखवावे लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रवाशाला विमान उड्डाण करतेवेळी ग्लोव्ह्ज, मास्क आणि डिस्पोजेबल कॅप्स सुद्धा खरेदी कराव्या लागतील.

लॉकडाऊननंतर हेल्थ चेकअप, तापाची तपासणी हा सुद्धा फ्लाइट्समधील प्रक्रियेचा भाग होणार आहे. त्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा विमान प्रवासाआधी दाखवावं लागण्याची शक्यता आहे.

याबाबत डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, एअरपोर्ट आणि एअरलाइन्सचे अधिकारी आदींची एक टेक्निकल कमिटी विमान प्रवासासाठी आखाव्या लागणार्‍या नवीन नियमांबाबत चर्चा करत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखणे हा याचा हेतू आहे. यासाठी या समितीकडून प्रवासी आणि एअरपोर्ट स्टाफसाठी मानक संचालन प्रक्रिया तयार करण्यात येत आहे. फ्लाइट्स 15 मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील लॉकडाऊन पूर्णपणे हटण्यास जून महिना उजाडण्याची शक्यता आहे.

काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी मिडल सीट रिकामी ठेवण्याचा विचार करत आहेत. कोरियन एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे क्रू मेंबर्स टेक ऑफपासून लँडिंगपर्यंत चश्मा, फेस मास्क आणि गाऊन घालूनच राहतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *