यशोगाथा २०२० : लॉकडाऊनमधील रेशीम शेतीचा 'यशस्वी' प्रयोग

सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्याची यशोगाथा
यशोगाथा २०२० : लॉकडाऊनमधील रेशीम शेतीचा 'यशस्वी' प्रयोग


नाशिक । Nashik

शेतीत यशस्वी प्रयोग करावा या हेतूने रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. अन लॉक डाऊन झाल.पहिल्यादांच केलेला रेशीम उद्योगाचा प्रयोग ऐन लॉक डाऊनमुळे फसलेला होता. तरीही न डगमगता पुन्हा नव्याने लागवड करीत रेशीम शेती यशस्वी करणाऱ्या मनोहर पवार या शेतकऱ्याची हि गोष्ट.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालक्यातील बर्हे जवळील वाघ नखी हे गाव. सुरगाणा तालुका हा पारंपारिक शेतीसाठी ओळखला जातो. त्यामुळे येथील शेतकरी नेहमीच नव करण्यावर भर देत असतो. अलीकडेच या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर स्त्राबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. भात, वाराई, नागली अशा पिकांची पार्श्वभूमी असलेल्या मनोहर यांनी रेशीम उद्योगाची शेती यशस्वी केली आहे. महत्वाचे म्हणजे शेतीपूरक व्यवसाय म्हणून पर्याय शोधत असताना त्यांना रेशीम शेतीचा पर्याय मिळाला.

वाघनखी हे तस आदिवासी डोंगर दरयात वसलेलं गाव. परंतु अलीकडे स्थानिक अधिकाऱ्यामुळे येथील शेतकरी प्रगतशील झाला आहे. मनोहर यांना येथील तलाठ्याकडून रेशीम उद्योगाची माहिती मिळाली. शासनाकडून असलेल्या या योजनेचा त्यांना उपयोग करण्याचे ठरविले. सुरवातीला पवार यांनी तुतीची पट्टा पद्धतीने लागवड केली. यासाठी त्यांना पंधरा हजार खर्च आला.

त्यानंतर दोन किंवा तीन दिवसांच्या अंतराने ठिंबकच्या सहाय्याने पाणी दिले. मशागत, खत व पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाने तुतीची बाग महिनाभरात चांगली बहरात आली. परंतु ऐन बहरात आलेला रेशीम उद्योग डबघाईला गेला. रेशीम काढणीनंतर बाजारात नेण्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन झाले. अन रेशीम शेती यशस्वी करून प्रयोग फसलेला होता. यावेळी पवार यांनी अवघ्या दोनशे रुपये किलोने रेशीम विकले.

या घटनेनंतर पवार यांनी पुन्हा रेशीम शेतीचा प्रयोग करण्याचे ठरवले.पुन्हा त्याच एक एकरमध्ये तुती रोपांची लागवड केली. त्यानंतर नाशिकहून अंडे घेऊन गेले. चार पाच दिवसांतच रोपांना चांगला बहर आला. कीटक संगोपनगृहाची (शेड) उभारणीही त्यांनी केली. 50 बाय 20 फूट अंतरावर उभारण्यात आलेल्या शेडमध्ये रॅक तयार करण्यात आल्या.

कोषनिर्मिती करण्यासाठी अंडीपुंजांचे संगोपन केले. अळ्यांना वेळेनुसार तुतीचा पाला टाकण्यात आला. पंधरा दिवसानंतर अधिक पाला टाकण्यात आला. पीक सुरू करण्यापूर्वी व पीक संपल्यानंतर कीटक संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.


रेशीम कोष उत्पादनाच्या व अंडीपुंजांच्या व्यवस्थेवेळी मजुरांची गरज भासली. त्यामुळे गावातूनच मजूर महिलांना घेऊन हि कामे केली. या महिलांना सरकार कडूनच ३६२ रुपये रोज देण्यात आला. तर शेड उभारणीसाठी पन्नास हजारांचा खर्चही शासनाने पुरवला. त्यानंतर महिनाभरात पुन्हा एकदा रेशीम उत्पादन चांगल्या रीतीने शक्य झाले. यावेळी मात्र चांगला भाव मिळाल्याने गावातील इतर शेतकऱ्यांनीही कौतुकाचा करीत पाठीवर शाबासकीची थाप दिली. पवार यांची रेशीम शेतीतील प्रगती पाहून गावातील इतर शेतकऱ्यांनी हा प्रयोग करण्यास सुरवात केली आहे.


कुटुंबाचा संपूर्ण सहभाग
रेशीम उद्योगात कुटुंबाचा संपूर्ण सहभाग आवश्यकच असतो, असे पवार सांगतात. रेशीम व्यवसायात त्यांना पत्नी व कुटुंबातील इतर व्यक्तींनी मोठी मदत केली. प्रत्येकाकडे कामांची जबाबदारी विभागून देण्यात आली होती. कुटुंबाची चांगली साथ मिळाल्याने मजुरांची फारशी आवश्यकता पडली नाही. अळीच्या चौथ्या अवस्थेनंतर मजुरांची गरज अधिक भासते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com