Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedलॉकडाउनमध्ये संयमाने साजरे केले आनंद सोहळे!

लॉकडाउनमध्ये संयमाने साजरे केले आनंद सोहळे!

नाशिक l Nashik (गौरव परदेशी)

संपूर्ण जगभरात कोरोना रोगाने थैमान घातलेले असून करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वच लोक घरात बंदीस्त झाले. दिवसागणिक वाढणारे करोना रुग्णसंख्या धास्ती भरवणारी होती.

- Advertisement -

हे ‘अस’ अजून किती दिवस चालणार हा सर्वसामान्यांचा मनातील एकमेव प्रश्न होता. अशात येवू घातल्या अनेक सन उत्सवांवर अपोआप निर्बंध आली. सर्वांनीच आपापल्या कुटुंबियासोबत सन उत्सव इतर कार्यक्रम घरीच साजरे केले.

सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आपआपल्या घरी साजरे करण्याचे आवाहन वेळोवेळी शासनाकडून तसेच सर्व सामाजिक स्तरातून करण्यात येत होते.

आयुष्यात असा लॉकडाऊन वैगेरे काही होईल याचा विचार हि मी कधी स्वप्नात केला नव्हता. अशात काही दिवसान आधी बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. मी हि दि. २५ मार्चला तिकडे जाणार होतो. परंतु दि. २३ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला आणि सर्व ‘जैसे थे’ झाला. अनेक पर्यंत करून देखील मला तिला भेटता आले नाही. माझ्या गैरहजेरीतच माझ्या मुलीचा जन्म झाला. तिला फक्त व्हिडिओ काँँलनेच पाहू शकलो याची खंत आयुष्यभर वाटत राहील. पुढे मग मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात पोलिसांकडून रीतसर परवानगी घेऊन मी मुलीला व बायकोला भेटण्यासाठी गेलो.

अविनाश वाघ, मालपुर

करोना आणि त्यामुळे होणारे लॉकडाऊन यांचा परिणाम माझ्या सह अनेकांच्या जीवनावर झाला आहे. यापूर्वी जेवण्यासाठी आणि झोपेसाठी केवळ घराचा उपयोग होत होता. परंतु लॉकडाऊनमध्ये सारे गणित बदलेले पाहायला मिळाले. कधी नव्हे तो इतका वेळ कुटुंबीयांसोबत घालवण्यासाठी मिळाला. त्यात आई-बाबांचा जन्म वाढदिवस कधी नव्हे तो एकता खास पद्धतीने साजरा करता आला. सालाबादाप्रमाणे बाहेर खानावळीत न जाता स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालण्याचा योग या निमित्ताने आला. तसेच राम नवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा अश्या सणांची तयारी मोठ्या उत्साहात आई-बाबा व घरातील भावंडांसह केली. माझ्यासह घरातील प्रत्येकाचा सहभाग व उत्साह या काळात द्विगुणीत झाला होता. कधी नव्हे तो असा एकत्र राहण्याचा योग लॉकडाऊनच्या निम्मिताने जुळून आला होता.

साबिक देशमुख, नाशिक

मार्च ते मे हे खरे तर आपल्याकडे लग्नाचा सिझन असतो. अनेकांचे विवाह आधी पासूनच ठरले असतात परंतु अनपेक्षित लॉकडाऊनमुळे अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले असाच काहीसा अनुभव माझ्या घरात आला. मावशीच्या मुलीचा विवाह एप्रिल महिन्यात निश्चित करण्यात आला होता परंतु लॉकडाऊनमुळे विवाहास परवानगी न मिळाल्यामुळे आमच्या घरातील तो पहिला विवाह अगदी घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला. तो अनुभव माझ्यासह घरच्यांसाठी अनोखा होता.

वेदांत पाटील, मुंबई

- Advertisment -

ताज्या बातम्या