<p><strong>धुळे l Dhule (प्रतिनिधी)</strong> </p><p>लॉकडाऊनमध्ये किंवा त्यानंतर अनेकांचे रोजगार गेले. सामान्यांना दैनंदिन जीवन जगणेही अवघड झाले होते. याकाळात सर्व व्यवसाय, व्यापार बंद असतांना औषधी व जीवनावश्यक वस्तूंची व्यवसाय सुरु होता.</p>.<p>यामुळे धुळ्यातील व्यावसायिक अनिल मुंदडा यांनी हिन्दुस्थान युनिव्हर्सची एजन्सी सुरु केली. त्या माध्यमातून धुळ्यातील हजारो जणांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. सोबत ४० जणांना रोजगार दिला. पर्यायाने ४० परिवारांना त्याचा फायदा झाला.</p>