बोरखेडा हत्याकांड, बीएचआर प्रकरणामुळे जिल्हा चर्चेत

पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेसह कोरोनाची जबाबदारी
बोरखेडा हत्याकांड, बीएचआर प्रकरणामुळे जिल्हा चर्चेत

किशोर पाटील

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यासह राज्यात २०२० साल उजाडताच विशेष पोलीस महानिरिक्षकांसह पोलीस अधीक्षक रँकच्या सर्वच अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक म्हणून डॉ. प्रताप दिघावकर हे बदलून आले.

याचवेळी जिल्हा पोलीस दलाची कमान सांभाळण्यासाठी नव्या दमाचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे हे रूजू झाले होते. याबरोबरच जिल्ह्यातील प्रभारीं बदलून दुसर्‍या जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांनी पदभार सेांभाळला होता. त्यामुळे २०२० हे वर्ष जिल्ह्यात कोरोनाबरोबरच अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या बदल्यांमुळे तर दुसरीकडे रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चिमुकल्यांचे हत्याकांड, व वर्ष सरतेशेवटी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर प्रकरणात जळगावात टाकलेले छापे यामुळे लक्षात राहिल.

जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक म्हणून डॉ.प्रविण मुंढे हे २२ सप्टेंबर रोजी रूजू झाले नवा भिडू नवा राज याप्रमाणे गुन्हेगारी व कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्याच्या जबाबदारीसह कोरोनाची एक नवी जबाबदारी आली होती.

दुसरीकडे रावेर तालुक्यात चिमुकल्यांच्या हत्यांकाडाने जिल्ह्यासह राज्य हादरले होते. विशेष पोलीस महानिरिक्षकांबरोबरच पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनाही हा जिल्हा नवीन होता. तो समजून घेत असतांनाच रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे चिमुकल्यांचे हत्याकांड घडले. या हत्यांकांडामुळे राज्याचे सर्व लक्ष जळगाववर केंद्रीत झाले. गृहमंत्र्यांसह अनेकानी भेट दिली.

संघटनांनीही आरोपींना अटक करुन कठोर कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्या. खुद्द विशेष पोलीस महानिरिक्षक बोरखेड्यात ठाण मांडून राहिले. त्याच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही दिवसातच हत्याकांडाचा उलगडा झाला. आरोपी निष्पन्न होवून त्यास अटक झाली. या हत्याकांडानेही पून्हा जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यभर पोहचल्याने २०२० हे साल हे लक्षात राहिल.

हत्याकांडानंतर जळगाव शहरात सलग खूनाच्या घटना घडल्या. गुन्हेगारांनी वरिष्ठांसह प्रभारींना गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान दिले.

एक एक करत आरोपींना अटक करत आरोपींची कारागृहात रवानगी झाली. २०२० साल हे पोलीस दलासाठी नव्हेच तर जिल्ह्यासाठी सकारात्मक बाब म्हणून लक्षात राहिले ते म्हणजे रावेर येथील दंगलीतील झालेल्या नुकसानाची आरोपींकडून नुकसान भरपाईचा प्रस्तावामुळे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविणारा जळगाव जिल्हा हा राज्यात एकमेव ठरला.

जळगावात मुख्य कार्यालय असलेल्या बीएचआर पतसंस्थेचा घोटाळा राज्यभर चर्चेत आहे. मात्र याच बीएचआर अपहारप्रकरणात पुणे येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात छापे टाकले. दिग्गज पुढार्‍यांचे निकटवर्तीय असलेले सुनील झंवर यात संशयित असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले. यात सहा जणांना अटक झाली. तर अवसायक जितेँद्र कंडारे, सुनील झंवर हे अद्यापही फरार आहेत.

याचदरम्यान राज्यभरात बीचआरप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेत असलेल्या संचालकांसह १४ जणांविरोधात जिल्हा न्यायालयात खटल्याला सुरुवात झाली. याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशाप्रकारे गुन्हेगारीबरोबरच बीएचआरप्रकरणातील छापेमारीमुळेही २०२० हे वर्ष अनेकांच्या कायम स्मरणात राहिल, यात शंका नाही.

- मो. नं. ९२०९९७८०८५

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com