Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

फ्लॅशबॅक २०१९ : राजकिय उलथापालथ करणारे वर्ष २०१९

Share

हे वर्षं भारतीय राजकारणात उलथापालथ करणारे ठरले. या वर्षाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही उलथपालथ पहावयास मिळाली. या 2019 या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूका, नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान, महाराष्ट्रत शिवसेना भाजप युती संपुष्टात आली.

नरेंद्र मोदीं सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान

17 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार बहुमत मिळवले. या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकत सरकार स्थापन केले. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा वाराणसीमधून निवडणूक लढवत चार लाख मतांनी विजय मिळविला. सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले.

राहुल गांधींचा अध्यक्ष पदाचा राजीनामा

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत सर्वांना बुचकळ्यात पाडले. लोकसभा निवडणुकीत कडव्या पराभवानंतर राहुल गांधींनी जुलैमध्ये पदाचा राजीनामा दिला.

वायएसआर रेड्डीं यांना जगमोहन रेड्डींचे आव्हान

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आंध्रप्रदेशात भाजपला शह देत वायएसआर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. या बदलासाठी कारणीभूत ठरलेले महत्वाचे नाव म्हणजे जगनमोहन रेड्डी होय.  46 वर्षीय वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी चंद्रबाबू नायडू यांचे सरकार राज्यातून काढून टाकले.

सेना भाजप युतीचा अंत

महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण देणारी घटना म्हणजे 30 वर्ष अबाधित असलेली भाजप शिवसेना युती तुटली. यंदा मात्र 50-50 फॉर्म्युला मुळे सगळी राजकीय गणिते बदलून गेली.शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत महाशिवआघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली.

झारखंडमध्ये भाजचा दारुण पराभव

महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर  भाजपला आणखी एक जोरदार धक्का काँग्रेसने दिला. येथील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजपचा पराभव केला. झामुमोच्या हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात विरोधीपक्ष आघाडीने भाजपला सत्तेतून हद्दपार केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!