15 ऑगस्टनिमित्त झेंड्यांची विक्री जोरात; खादी ग्रामोद्योगमध्ये गर्दी, विविध संस्थांकडून मागणी

0
नाशिक | भारताचा स्वातंत्र्यदिन अर्थात 15 ऑगस्ट केवळ चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी सर्वच शासकीय अस्थापनांसह खासगी संस्थांमध्ये उत्साहात झेंडावंदन करण्यात येते. हे लक्षात घेऊन विविध संस्थांकडून तिरंगी झेड्यासाठी असलेली मागणी वाढली आहे. नाशिकमधील पारंपरिक झेंडा खरेदी करण्यासाठी खादी ग्रामोद्योग दुकानात ग्राहक वाढले आहेत.

झेंडा तयार करण्यासाठी तामिळनाडूमधून कापड आणले जातात. त्यावर बिल्चिंंग प्रक्रिया केल्यानंतर कापडाला तिरंगी रंग दिला जातो. त्यानंतर कारागिराकडून आकारानुसार झेंडा शिवून घेतला जातो. 2 बाय 3 फूट, 3 बाय साडेचार फूट, 4 बाय 6 फूट, 6 बाय 9 फूट या आकारात झेंडे बनविले जातात.

15 ऑगस्ट, 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाला शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, बँका यांच्याकडून तिरंगी झेंड्याला मागणी असते. खादी ग्रामोद्योगमध्ये होलसेलमध्येही झेंड्याची विक्री होते. शाळा, कॉलेज यांच्याकडून दोन बाय तीन फूट झेंड्याला मागणी जास्त असते.

6 बाय 9 फूट आकाराच्या तिरंगी झेंड्याची मागणी जिल्हाधिकारी किंवा तत्सम कार्यालयांकडून असते. याशिवाय खासगी शाळा अथवा छोट्या संस्थांकडून 2 फूट बाय 3 फूट या झेंड्याची मागणी केली जाते. काही जण आपल्या घरावर, आपल्या गाड्यावरही झेडे लावण्यासाठी बनवून घेतात.

त्यासाठीही झेड्यांना मागणी आहे. याशिवाय राजकीय पक्षांबरोबरच मोठमोठ्या व्यक्तीही हौसेने स्वातंत्र्यदिनी झेंडा लावतात. 200 रुपयांंपासून 1 हजार ते 1500 रुपयांपर्यत या झेंड्याची किंमत आहे. एकदा घेतलेला झेंडा साधारपणे पाच ते सहा वर्षे आरामात टिकतो. कॉटन झेंड्यांसह आता सिल्कमध्येही झेंडा तयार होत असून त्यालाही सरकारी कार्यालयांकडून मोठी मागणी असल्याचे चित्र आहे.

नागरिकांनी तिरंगी झेंडा वापरताना काळजी घेतली पाहिजे. कागदी, प्लास्टिक झेंड्यांचा वापर मुले करतात. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन झाल्यानंतर हे झेंडे रस्त्यावर पडलेले दिसतात. असे होऊ नये यासाठी दक्षता घ्यायला हवी.

LEAVE A REPLY

*