चौदा दिवसानंतर फुटली खुनाला वाचा; बेपत्ता बालिकेची निर्घृण हत्या

0
इगतपुरी / घोटी । इगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला या गावातून गेल्या चौदा दिवसापासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय बालिकेची हत्या झाल्याचे उघड झाले असून याबाबत संशयितांने कबुली दिली आहे. या बालिकेवर अतिप्रसंग करताना विरोध केल्याने तिच्या डोक्यात दगड घालून, गळा आवळून हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिल्यावर पोलिसांनी आज या बालिकेचा निर्जनस्थळी पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला.

याबाबत वृत्त असे की, आवळी दुमाला येथील किरण जमधडे ही पाच वर्षीय बालिका गेली चौदा दिवसापासून बेपत्ता झाली होती. याबाबत या बालिकेचे वडील रमेश जमधडे यांनी घोटी पोलीस ठाण्यात माझ्या मुलीचे गोपीनाथ दत्तू जमधडे या संशयित व्यक्तीने अपहरण केले असल्याची तक्रार दिली होती. यामुळे या बालिकेला शोधण्याचे गंभीर आव्हान घोटी पोलिसांसमोर उभे राहिले होते.

या गंभीर प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेवर सोपविली होती. दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने या संशयितास शहापूर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता सदर बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तिने आरडा ओरडा केल्याने तिच्या डोक्यात दगड घालून तसेच गळा आवळून हत्या केल्याची, तसेच तिचा मृतदेह गावाजवळ एका निर्जनस्थळी असलेल्या नाल्यात पुरले असल्याची कबुली संशयितांनी दिली.

यानुसार आज सकाळी तहसीलदार अनिल पुरे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अडसूळ, संदीप हांडगे, नवनाथ गुरुळे, शिवाजी जुंदरे वैद्यकीय अधिकारी डॉ. लचके यांनी संशयितांनी दाखविलेल्या ठीकाणी शोध मोहीम राबविली असता, सदर बेपत्ता बलिकेच्या मृतदेहाचा सांगाडा, कपडे व बांगड्या मिळून आल्या आहेत.

दरम्यान, गेली चौदा दिवसापासून बेपत्ता असलेल्या बालिकेची नात्याने चुलता असलेल्या व्यक्तीनेच हत्या केल्याची घटना उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गोपीनाथ जमधडे यास जेरबंद केले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या.

गेली चौदा दिवसांपूर्वी अंगणात हसत खेळत असलेल्या माझ्या पाच वर्षांपूर्वी किरण नामक चिमुरडी अचानक गायब केले होते.  याबाबत घोटी पोलिसात तक्रार दिली होती, काही दिवसांनंतर आमच्या घरा शेजारी राहणाऱ्या व नात्यातीलच गोपी दत्तात्रय जमधडे याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली होती. परंतु त्याने उडवाउडवीचे उत्तर देऊन पोलिसांच्या ताब्यातुनही निसटला होता. यात आमचा संशय खरा ठरला असून त्यानेच आमच्या कवळ्या मुलीवर अत्याचार करून तिची क्रूर हत्या केली. पोलिसांनी व शासनाने जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर या नराधमाला कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी.
 
रमेश जमधडे (मृत मुलीचे वडील)

LEAVE A REPLY

*