पिंपळगाव बसवंत येथे 5 वर्षीय बालकाची हत्या

0

पिंपळगाव बसवंत | येथील ईस्लामपुरा साहिल ऊर्फ दादु लुकमान पिंजारी या मुलाची रमजानच्या पूर्वसंध्येला हत्या झाल्याची धक्कादायक   घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव बसवंत येथील ईस्लामपुरा या ठिकाणी लुकमान गणी पिंजारी हे आपले पत्नी तीन मुली व एक मुलगा  असा परीवारासह साध्या घरात राहतात.
काल (दि 25) रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास साहिल ऊर्फ दादु हा अचानक गायब झाला होता. त्यानंतर त्याची शोधा शोध सुरु झाली. साहिल न सापडल्याने सदरची बाब पोलीस ठाण्यात कळवली.  यानंतर सदर साहिलचा शोध घेण्यासाठी शंभर ते दीडशे जणांनी ईस्लामपुरातील जवळपास साडेतीनशे घरापर्यंत जाऊन तपासणी केली.
मात्र साहिल मिळुन आला नाही. लुकमान पिंजारी यांच्या घराजवळच भिकन नजिर पिंजारी हा जवळचा नातेवाईक राहतो. या घराला बाहेरून कुलुप लावून घराबाहेर अमिना नजीर पिंजारी ही महिला बसली होती.
या घराची झडती घेण्यासाठी येथील नागरिक गेले असता सदर महिलेने अटकाव केला मात्र नागरिकांनी अटकाव झुगारून घर ऊघडले असता घरात पलंगावर गादी गोळा केलेली दिसली व गादीच्या बाहेर साहिल याचे पाय दिसले. सदर गादी उलगडून बगीतली असता साहिल याचा गुदमरून म्रुत्यु झाला असल्याचे निदर्शनास आले.
रात्री साडेअकरा वाजता जवळ असलेल्या घरी साहिल सापडल्याने त्यास तात्काळ सरकारी दवाखान्यात दाखल केले मात्र डाॅक्टरानी त्यास मयत घोषीत केले.
सदर चा प्रकारातील मुख्यआरोपी भिकन नजिर पिंजारी याने रात्री आठ वाजता साहिल यास चाॅकलेटचे आमिष दाखवून घरी कोंडुन ठेवले व त्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला.  लैंगिक शोषण करण्याच्या हेतुने त्यास तोंड दाबून जिवे ठार मारण्याचा हा प्रकार घडला.
याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*