पंचवटी पोलिसांनी केली खून प्रकरणातील पाच जणांना महाबळेश्वरमधून अटक

0

पंचवटी (प्रतिनिधी) ता. १९ : खून आणि खंडणीसारख्या गुन्ह्यात फरारी असलेल्या पाच आरोपींना पंचवटी पोलिसांनी महाबळेश्वर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे.

व्यंकटेश नानासाहेब मोरे, अमिन दत्तात्रय व्यवहारे, अक्षय भडांगे, सुशील गायकवाड, समीर दत्तात्रय व्यवहारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डे, पंचवटी यांच्या मार्गदर्शकाखाली गुन्हे शोध पथक काल सायंकाळी रवाना झाले होत.

महाबळेश्वरजवळील हॉटेल गुगल येथून या सर्वांना ताब्यात घेऊन दुपारी नाशिकमध्ये आणण्यात आले.‍

त्यांच्यावर खून, खंडणी यासारखे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र ते अनेक दिवसांपासून फरारी होते.

 

LEAVE A REPLY

*