पाच चंदनचोर जेरबंद

0
इंदिरानगर प्रतिनिधी | पाथर्डी गाव परिसरात इंदिरानगर पोलीसांची गस्त सुरु असतांना संशयितरित्या जाणार्या इंडिका कारची चौकशीसाठी थांबविल्यानंतर या गाडीतून चंदनाची चोरी करुन जाणारे पाच जण हत्यारासह पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मध्यरात्रीच्या सुमारास एमएच – 16- एबी-1623 या क्रमांकाची गाडी संशयितरित्या जात असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. पोलीसांनीही या गाडीचा पाठलाग करुन इंडिका गाडी अडविली. त्यावेळी गाडीत एक पिस्तुलसह झाडे कापण्याच्या कट्यार आढळून आले.

त्यामुळे पोलीसांनी सेामनाथ मधुकर कुऱ्हाडे, गणेश भानुदास कुऱ्हाडे, सचिन मधुकर कुऱ्हाडे, अनिल अशोक कुऱ्हाडे, कैलास भानुदास कुऱ्हाडे या पाचही जणांची चौकशी केली असता, त्यांनी चंदनाच्या झाडाची कत्तल करून चोरी केल्याचे समोर आले.

विराज सोसायटीतील सिक्युरिटी संजय बाबुलाल भावसा यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात येवून विराज सोसायटीत चंदनाच्या झाडाची कत्तल करीत असल्याचे सांगितले. चंदनाची झाडाची कत्तल करीत असतांना झाडाजवळ जावून पाच जणांना बघितले असून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलीसांनी या पाचही जणांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

*