Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुथूट फायनान्स दरोडा प्रकरण : एकट्या संजू सम्युअल्सच्या अंगात सापडल्या पाच गोळ्या

Share

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात झालेल्या दरोड्याच्या प्रयत्नात झालेल्या गोळीबारादरम्यान तांत्रिक अभियंता संजू सॅम्युअल (वय ३२, मूळ रा. केरळ) हे मृत्युमुखी पडले होते. अद्याप या घटनेचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. सॅम्युअल यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शवविच्छेदनानंतर सॅम्युअल यांच्या अंगात दरोडेखोरांनी पाच राऊंड फायर केल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी आनंद पवार यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

चार दिवसांपूर्वीची सॅम्युअल मुंबईहून नाशिकच्या कार्यालयात लेखापरीक्षणासाठी आले होते. नेहमीप्रमाणे फायनान्स कंपनीचे सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास काम सुरु झाले.

तोच काही दरोडेखोर याठिकाणी आले त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली. इतक्यात सॅम्युअलने दरोडेखोरांना न भिता सायरन वाजवत बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र, दरोडेखोरांनी सॅम्युअलला लक्ष करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

सुरुवातीला तीन राउंड सॅम्युअलच्या छातीवर केल्याचे सांगितले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकट्या सम्युअलच्या छातीतून आडव्या तिडव्या अडकलेल्या पाच गोळ्या काढल्या. यामुळे बंदुकीतून पाच नाही तर ७-८ राऊंड फायर झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी घटनेनंतर ताबडतोब शहराच्या सीमा सील करत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, अद्याप संशयित पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेले नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!