ग्रामपंचायतींकडून पाच लाख वृक्षलागवड

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेतर्ंगत जिल्ह्यातील 1 हजार 311 ग्रामपंचायतींनी एकूण 4 लाख 93 हजार 188 वृक्ष लागवड केली असल्याची माहिती जिल्हा परिषद रोहयो विभागाने दिली.
यंदाच्या पावसाळ्यात वन विभागाच्या नियंत्रणाखाली विविध कृषी, ग्रामपंचायत आदी विभागांच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते.
त्यासाठी वन विभागाने ग्रामपंचायतींना पाच लाख रोपे मोङ्गत दिली होती. दरम्यान, प्रत्येक ग्रामपंचायतींने खड्डे खोदून वनविभागाकडे रोपांची मागणी केली होती.त्यानूसार गावात शाळा, महाविद्यालय, दवाखाने, बाजारतळ, मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे.
तालुकानिहाय वृक्षलागवड अशी- अकोले-48 हजार 589, संगमनेर-48 हजार, कोपरगाव-14 हजार 944, राहाता-27 हजार 112, श्रीरामपूर-27 हजार 517, राहुरी-33 हजार 250, नेवासा 40 हजार, शेवगाव-28 हजार 477, पाथर्डी-39 हजार 201, जामखेड- 26 हजार 310, कर्जत-39 हजार 959, श्रीगोंदा-18 हजार 887, पारनेर-46 हजार 112 व नगर तालुक्यात सर्वाधिक 54 हजार 735 रोपांची लागवड करण्यात आली आहे.
………….
वृक्ष संवर्धनाचा प्रश्‍न
दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायतींकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली खरी,पण त्याच बरोबर संवर्धनाची जबाबदारी तितकीच महत्वाची आहे.मात्र, रोपांची लागवड केल्यानंतर त्याच्या संगोपनासाठी आवश्यक पाणी, संरक्षणासाठी कुंपन याकडे दुर्लक्ष करणारे गावपुढारी ङ्गोटोपुरतेच वृक्षलागवड करण्याच्या ठिकाणी उपस्थित राहतात.त्यामूळे वृक्षलागवड कार्यक्रम हा आता ङ्गार्स ठरत असल्याचे दिसून येत आहे. झाडे जगविण्यात अपयश येत असल्याने दरवर्षी बहुधा त्याच ठिकाणी वृक्षलागवड करण्याची वेळ येते.
…………….

LEAVE A REPLY

*