Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

पाचशे सदोष मतदान यंत्रे परत पाठवली

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी बंगळुरुहून नाशिक जिल्ह्यासाठी इव्हीएम, व्हिव्हीपॅट व कंट्रोल युनिट यंत्रे प्राप्त झाली होती. अंबड येथील वेअर हाऊस येथे त्यांची तांत्रिक चाचणी सुरु आहे. या चाचणीत जवळपास 500 मतदान यंत्रांमध्ये दोष आढळला. ही यंत्रे पुन्हा बेल कंपनीकडे पाठविण्यात आली आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी 15 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे आहेत. 288 मतदारंसंघासांठी निवडणूक होणार असून त्यासाठी मोठया प्रमाणात व्हीव्हीपॅट, ईव्हीएम, कंट्रोल युनिट यंत्रे लागणार आहेत. पुणे व बंगळुरुं येथील बेल कंपनीकडून ही यंत्रे मागविण्यात आली आहेत. तर, काही यंत्रे ही उत्तरप्रदेश व तामिळनाडू राज्यातून मागविण्यात आली आहेत. जिल्हा निवडणूक शाखेने जिल्ह्यासाठी जवळपास 12 हजार यंत्रांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.

त्यापैकी 1 ऑगस्टला बंगळूरू येथील बेल कंपनीकडून 2590 कंट्रोल युनिट व 2780 व्हीव्हीपॅट यंत्रे नाशिक जिल्ह्यासाठी प्राप्त झाली होती. ही सर्व यंत्रे अंबड येथील वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आली होती. दोन दिवसांपासून या यंत्रांची तपासणी केली जात आहे. त्यामध्ये बटण व्यवस्थितरीत्या दाबले जाणे, मतदान केल्यावर बिप आवाज येणे, त्यानंतर मतदान केल्याची चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये पडणे व इतर तांत्रिक चाचणी घेत पडताळणीचे काम सुरु आहे.

या चाचणीत जवळपास प्रारंभी पाचशे मतदान यंत्रे नादुरुस्त असल्याचे आढळले आहेत. मतदानाच्या वेळी कोणताही धोका नको अथवा त्यावरुन वाद उदभवता काम नये याची दक्षता घेत ही यंत्रे बेल कंपनीकडे परत पाठविली जात आहे.

दोनशे कर्मचारी कार्यरत

निवडणूक पूर्व तयारीने वेग घेतला असून अंबड येथील वेअर हाऊस या ठिकाणी 1 ऑगस्टपासून 200 निवडणूक कर्मचारी कार्यरत आहे. मतदान यंत्रांची सुरक्षितता, यंत्राची चाचणी घेणे व इतर कामे प्राधान्याने केली जात आहे. पुढील काळात अजून मतदान यंत्रे प्राप्त होणार असून ती या ठिकाणी ठेवली जाणार आहे. साधारणत: कर्मचार्‍यांच्या मानधनापोटी दिवसाला दोन लाख रुपये खर्च येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!