Video : मनमाडमध्ये ५ तासांचा ‘मेगाब्लॉक’; अनेक गाड्या रद्द तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणार उशीर

0
मनमाड(प्रतिनिधी) | मनमाड रेल्वे स्थानकावर नविन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी आज सकाळी साडेसात ते दुपारी साडे बारा वाजेपर्यंत 5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत ज्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यात भुसावल – मुंबई पैसेंजर, मनमाड- इगतपुरी शटल, मनमाड- पुणे पैसेजर आणि साईनगर – जालना डेमो पैसेंजर या गाड्यांचा समावेश आहे.

मेगा ब्लॉकमुळे काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे. रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल हा ब्रिटीश कालीन असल्याने तो कमकुवत झाला असून प्रवाशांसाठी हा पूल धोकादायक झाला आहे.

हा पूल तोडण्याअगोदर नवीन पादचारी पूल बांधला जात आहे. मात्र त्याचे काम रखडले होते. अखेर आज रखडलेल्या कामाला सुरुवात करण्यात आली असून रेल्वेने 5 तासाचा मेगा ब्लॉक घेतला आहे.

LEAVE A REPLY

*