येवल्यात पोलिसांनी कोंबिंगद्वारे पकडले घरफोडी व सोनसाखळी चोरांना

0

नाशिक, ता. २९ : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने व्यापक कोंबिंग ऑपरेशन राबवून येवला शहरातील घरफोडी व सोनसाखळी चोरांना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला शहराचा पैठणी व्यवसायामुळे विकास झाला असून आजूबाजूच्या परिसरात नागरी वस्ती वाढलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते.

दरम्यान  नाशिकचे पोलीस अधीक्षक श्री. संजय दराडे व अपर पोलीस विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार येवला स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर नवले यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना देऊन घरफोडी, चोरी करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला.

त्यानुसार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे येवला शहरात सापळा सापळा रचला. तसेच परेगाव रोड, कनकोरी ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद अशा ठिकाणी कॉम्बिग ऑपरेशन करून छापे घातले.

त्यात 1) किरण उर्फ शिव छगन सोनवणे रा. पेठ रोड नाशिक, हल्ली मुक्काम कोपरगाव जि. अहमदनगर. 2) सागर गुलाब पवार रा. पारेगाव, 3)संतोष उर्फ सोन्या बबन वाघचौरे रा. पारेगाव ता. येवला. 4) शंकर कुमावत रा. पारेगाव रोड येवला, 5) चांगदेव भानुदास निकम रा. कनकोरी ता. गंगापूर जि. औरंगाबाद या संशयितांना पकडले.

‍त्यांनी घरफोडी, वाहनचोरी, सोनसाखळी चोरी अशा अनेक चोऱ्यांची कबुली दिली.  तसेच काही मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*