Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

अबब…आंध्र सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री; नव्या जगमोहन पॅटर्नची चर्चा

Share

तेलगु देसमला धूळ चारत आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यानंतर जगमोहन रेड्डी प्रकाशझोतात आले.  सगळीकडे त्यांच्याच नावाची चर्चा सुरु असताना त्यांनी त्यांच्या राज्यात तब्बल ५ उपमुख्यमंत्रींची निवड केल्यामुळे आणखीनच ते प्रकाशझोतात आले असून यानिमित्ताने राज्यासह देशात नव्या जगमोहन पॅटर्नचा उदय झाल्याचे बोलले जात आहे.

जगमोहन रेड्डी यांचा हा निर्णय इतिहास घडवणारा असून आजपर्यंत कुठल्याही राज्यात असा प्रयोग करण्यात आला नाही. त्यामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, सत्तेचा समतोल राखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री निवड करण्याचा प्रयोग अनेक राज्यांनी केला. आंध्र प्रदेशच्या आधीच्या सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी मागासवर्गीय व कप्पू समाजाला प्रतिनिधित्व म्हणून दोन उपमुख्यमंत्री नेमले होते.

उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्येही काही काळ दोन उपमुख्यमंत्री होते. मात्र, जगनमोहन यांचा पाच उपमुख्यमंत्रिपदाचा प्रयोग पहिलाच आहे.

वायएसआर काँग्रेसच्या आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत जगनमोहन यांनी ही घोषणा केली. त्यानुसार, जगनमोहन यांच्या मंत्रिमंडळात एएसी, एसटी, बीसी, अल्पसंख्याक आणि कप्पू समाजातील एका आमदाराला उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जनतेच्या आशा-अपेक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे जगनमोहन यांनी सांगितले. जगनमोहन सरकारचा शपथविधी शनिवारी होणार असून त्यांच्यासह २५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!