दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड

0

नाशिक | आडगाव पोलिसांकडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांची टोळी पहाटेच्या सुमारास जेरबंद करण्यात यश आले आहे.

औरंगाबाद रस्त्यावरील सिद्धिविनायक चौकातील मंगलदीप स्वीट परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत ही टोळी होती अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या टोळीत किरण भास्कर शेळके (वय २४), अविनाश मनोहर गावित (वय २०), अनिकेत कैलास माळी(वय १८) सर्व रा. मोठा कोळीवाडा, कसबे वाणी ता. दिंडोरी) राहुल चिंतामण बोडके (वय १८, रा. ओढा), रोहन देशमुख (वय १८, रा. आगरटाकळी) यांचा समावेश असून त्यांच्याकडून दोन धारदार तलवारी, तीन लेझर ब्लेड जप्त करण्यात आले आहेत.

घातक शस्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

*