पहिले तालुकास्तरिय आदिवासी साहित्यसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

सुरगाणा (प्रतिनिधी) ता.१० : जगात शांततेसाठी सर्वांचेच प्रयत्न निरर्थक ठरत आहेत. आता शांतता हवी असेल तर आदिवासींच्या विचारसरणीचा विचार  झाला पाहिजे.

माणसाचे आयुष्य हे माता व माती या दोन गोष्टी भोवतीच फिरत असते. निसर्गाची व्याप्ति खूप मोठी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रानकवी तुकाराम धांडे यांनी सुरगाणा तालुका स्तरिय पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनात केले.

साहित्य प्रेमी युवक वसंत राठोड यांनी आदर्श युवा मंडळ करंजुल व महाराष्ट्र राज्य  साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कला व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

संमेलनाचे अध्यक्ष श्री. धांडे हे  होते. यावेळी संमेलनाच्या ऊद्घाटन प्रसंगी बिरसा मुंडा  यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कणसरा मातेची द्यान पुजा करण्यात आली.

व्यासपीठावर प्राध्यापक संजय जाधव,  संपादक आमची माती आमची माणसं,  ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, बनकर, शशिकांत सावंत, सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,  प्राचार्य  चंद्रकांत  दिघावकर,  उप नगराध्यक्ष सचिन आहेर,  पुर्णा मिठारी, गोवर्धन, साहित्य संमेलनाचे सत्कारार्थी रतन चौधरी, रुपचंद डगळे, शिवचरित्रकार भाऊसाहेब  नेहरे, वसंत राठोड आदि उपस्थित होते.

संमेलनात कथाकथन, आदिवासी लोककला, खुले कवी संमेलन,  आदिवासी संस्कृतिचे दर्शन घडविले. डोंगर माऊली ऊत्सवाचे सादरीकरण करण्यात आले. रतन चौधरी यांना आदिवासींच्या जीवनावरील लेखना बद्दल आदिवासी साहित्य पुरस्काराचे प्रदान करण्यात आले.

दस-या सत्रात  कवी धांडे यांनी तिसरीच्या  पाठ्यपुस्तकातील रानवेडी, तसेच  दोन भावाची संप्पतीची वाटणी, जात नाही ती जात,  साहिब, आई होती तेंव्हा, माता व माती या कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.  साहित्यिक मालुंजकर  आदिवासींच्या व्यथा ,अज्ञान,  अंधश्रध्दा निर्मूलन, सावकारी या विषयावर व्याख्यान झाले.

आदिवासी प्रबोधनकार नेहरे यांनी आदिवासींचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि परंपरा याविषयी व्याख्यान दिले. तसेच स्वतंत्र उठावाचे आदिवासींचे आंदोलन हे कळवण, सुरगाणा,  चणकापूर लढा,  बागलाणमध्ये पेटले ते पेठ मध्ये विझले असा इतिहास सांगितला.

संमेलनाचा समारोप आदिवासी नृत्याने करण्यात आला. संमेलनाचे आयोजन तुळशीराम गावित, विठ्ठल  गावित, प्रेमराज पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

*