Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

Video : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा

Share

बंगाली अभिनेत्री नुसरत जहांने बंगालचे सुप्रसिद्ध व्यावसायिक निखिल जैन यांच्यासोबत लग्न केले आहे. नुसरत आणि निखिल यांचे तुर्कीतील इस्तंबूलमध्ये आज मोठ्या थाटात लग्न पार पडले. नुसरत लग्नामुळे लोकसभेत हजेरी लावू शकली नाही तसेच तिने अद्याप खासदारकीची शपथही घेतलेली नाही.

नुसरतचा विवाह सोहळयात खूप कमी पाहुण्यांना निमंत्रण होते. खासदार बनल्यानंतर नुसरत जहांची जवळची मैत्रीण आणि टीएमसीची तरुण खासदार मिमी चक्रवर्ती लग्नात दिसून आली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नुसरत टीएमसीच्या तिकिटावर बशीरघाट येथून लोकसभेवर निवडून गेली आहे.  नुसरतचे लग्न हिंदू रीती-रिवाजाने झाले.

 

आज लग्नसोहळ्यात नुसरत आणि निखिलने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसांची मुखर्जीने डिझाईन केलेले कपडे घातले होते. नुसरत लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यात ती खूपच जास्त सुंदर दिसत होती. १६ जून रोजी नुसरत आणि निखिल यांचे कुटुंब तुर्कीकडे रवाना झाले होते. १७ जून ला इंस्तानबुल मध्ये प्री-वेडिंग समारंभ झाला.

१८ जून ला मेहेंदी आणि संगीतचा समारंभ झाला. त्यानंतर १९ जून ला पारंपारिक रीती- रिवाजाने त्यांचे लग्न झाले. नुसरत लवकरच भारतात येऊन आपल्या मित्रांना रिसेप्शन देणार आहे.  नुसरतचा पती निखिल जैन कोलकताचे एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.

निखिल आणि नुसरतची ओळख गेल्या वर्षीच्या दुर्गा पूजा वेळी झाली होती. त्यानंतर दोघांचे बोलणे झाले आणि मग तिने शोतुर चित्रपटापासून पदार्पण केले. या व्यतिरिक्त २९ वर्षाची नुसरत निखिलच्या क्लोदिंग सीरीजची ब्रंड एंबेस्डरदेखील होती.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!