Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

फोटोगॅलरी : नाशकात पावसाची हजेरी; उकाड्यापासून सुटका

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना आज सुखद धक्का देत पावसाच्या सरी कोसळल्या. तब्बल अर्ध्या तासांपेक्षा अधिक काळ पाउस पडला. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना आज पावसाने ओलेचिंब केले.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने शहरात पाठ फिरवली, मात्र, मालेगाव, येवला, निफाड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची कोसळधार सुरु होती.

शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, सीबीएस, त्र्यंबकनाका परिसरात अचानक आलेल्या पावसाने पुरती धांदल उडाली. अनेक विद्यार्थी आजच्या पावसात भिजले.

नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतातील ढेकूळ पावसाच्या पाण्याने फुटल्यानंतर साधारणत: पेरणीला प्रारंभ होईल अशी माहिती शेतकरी वर्गाकडून मिळाली आहे.

सर्व फोटो : सतीश देवगिरे, नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!