Type to search

Video : नाशिक शहरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिक शहरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात सहा वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचे आगमन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या  नाशिककरांना आज पावसाच्या आगमनामुळे दिलासा मिळाला.

आजच केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. अजून मान्सून यायला किमान ८ ते दहा दिवस लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

अचानक आलेल्या पावसाने नाशिक शहरातील रस्ते तुटूंब भरून वाहत होते. छत्रपती शिवाजी स्टेडियमला तर धरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

शहरातील पंचवटी, सिडको, एमजी रोड, सीबीएस परिसरात पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झालेले बघायला मिळाले.

पहिल्या पावसात अबालवृद्धांसह मैदानावर असणाऱ्या खेळाडूंनी पावसात भिजून सराव  करत आनंद घेतला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!