सिन्नरमध्ये समृद्धीची पहिली जमीन खरेदी; पैसे तत्काळ बँकेत वर्ग

0

सिन्नर (प्रतिनिधी) ता. २९ : बहुचर्चित समृद्धी प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील पहिली जमीन खरेदी आज दि 29 सिन्नर येथे नोंदवली गेली.

तालुक्यातील वावी येथील बिजलाबाई किसन लांडगे या महिलेची 16 गुंठे जमीन शासनाने थेट खरेदी पद्धतीने विकत घेतली. त्याचा मोबदला २३ लाख रुपये आरटीजीएसने तत्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा झाला.

विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, रस्ते विकास महामंडळाचे विशेष अधिकारी किरण कुरणकर, प्रांत महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती लांडगे यांचेसह 3 शेतकऱ्यांना आयुक्त झगडे यांनी खरेदी खताची प्रत दिल. याशिवाय इतर 10 शेतकऱ्यांशी देखील आज खरेदी व्यवहार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*