Type to search

Breaking News टेक्नोदूत मुख्य बातम्या

पहिला महिला आमदार डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांना डूडलच्या माध्यमातून अभिवादन

Share

मुंबई : गुगल नेहमीच आपल्या डूडलच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्तीस अभिवादन करीत असतो. आज गुगलने भारतातील पहिल्या महिला आमदार डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्यावर डूडल तयार करण्यात आले आहे.

आज डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने हे डूडल तयार केले असून लोकशाही मार्गाने राजकारणात खऱ्या अर्थाने निवडणूक जिंकून राजकारणात आलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला असल्याचा बहुमान त्यानी मिळवला आहे.

दरम्यान डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी या नुसत्या आमदार नव्हत्या तर लिंगभेदावर आधारीत समाजव्यवस्थेविरुद्ध लढा, सामाजिक विषमता आणि आधुनिक विचारांच्या समाजसुधारक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. मुथुलक्ष्मी रेड्डी या तामिळनाडू राज्यातील सरकारी रुग्णालयात एक शल्यचिकित्सक म्हणूनही काम करणाऱ्या पहिला महिला ठरल्या.

पहिल्या महिला आमदार (लॉ मेकर) आणि सर्जन (शल्यचिकित्सक), समाजसुधारक असलेल्या अशा मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या कार्याची दखल घेऊनच गुगलने त्यांना गुगल डूडल बनवून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!