Type to search

Featured सार्वमत

फिरोदियांच्या ‘फोर्स’मध्ये वॉचमनला डांबले

Share

भिंगारच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल । चोरीचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या मालकीच्या फोर्स मोटार कंपनीच्या कोठला येथील शोरूममध्ये वॉचमला डांबून चोरीचा प्रयत्न झाला. काल रविवारी भरदुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सय्यद युसुफ राजू यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी भिंगारच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश शंकर भुजबळ आणि आनंद तागडकर ऊर्फ आळकुटे (रा. संभाजीनगर, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. युसुफ सय्यद हे फोर्स मोटारच्या कोठला येथील शोरूममध्ये वॉचमन आहेत. रविवारी पावणेदोन वाजेच्या सुमारास आरोपी भुजबळ व तागडकर हे मोटार्सच्या गेटवर चढून आत गेले. दोरीच्या सहाय्याने वॉचमन सय्यद यांचे हातपाय बांधले. त्यानंतर चोरीचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी चोरीचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे अधिक तपास करत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!