पत्नीच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडली

0

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील घटना

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील कोकमठाण येथे नवरा बायकोच्या वादात नवर्‍याचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नीच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून तिला जखमी केल्याची घटना 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 ते 6 वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर पती जखमी पत्नीला स्वत: दवाखान्यात घेऊन गेला. पोलिसांनी पती सुनील रक्ताटे याला अटक केली आहे.
या संदर्भात रवींद्र अंबादास कदम रा. पाच चारी महालखेड रोड रवंदे यांनी सुनील विश्वनाथ रक्ताटे याच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले की 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 ते 6 वाजेच्या दरम्यान सुनील व त्याची पत्नी माधुरी यांच्यात त्यांचे रहात्या घरी कौटुंबिक वाद झाले. या वादातून बेकायदा बाळगत असलेल्या पिस्तूलातून सुनीलने पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली व तीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
घटनेची कोणाला कल्पना येऊ नये म्हणून तीस स्वत: दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. माधुरी हिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला सुनील विश्वनाथ रक्ताटे याच्याविरुद्ध भादवि कलम 307 व आर्म अ‍ॅक्ट 3/25 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिकारी कादरी पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*