Type to search

Featured नाशिक

कौतुकास्पद : गुन्हे शोध पथकाने जीवाची पर्वा न करता विझवली रोहित्रास लागलेली आग

Share

इंदिरानगर | वार्ताहर

महावितरण कंपनीच्या रोहित्रास लागलेली आग इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने जीवाची पर्वा न करता विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

सोमवार (दि.24) रोजी नेहमी प्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश जगदाळे, रियाज शेख, भगवान शिंदे, हे मुंबई आग्रा रस्ता महामार्ग समांतर रस्त्यावरून चेतना नगर येथे गस्त घालत असताना त्याच वेळी समांतर रस्त्या लगत असलेल्या महावितरणच्या कंपनीच्या रोहित्राची वायर एका वाहनाने तोडल्याने अचानक मोठा आवाज होऊन रोहित्राने पेट घेत आग लागली.

तातडीने गुन्हे शोध पथकाने वाहन थांबून परिसरातील माती वाळूने जीवाची परवा न करता आग विजवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!