दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलच्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

0
नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या करोलबाग परिसरातील हॉटेल अर्पित पॅलेस मध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली. या आगीत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आग हॉटेलच्या वरच्या मजल्यावर लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

सुमारे चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. आता ही आग विझवण्यात आली आहे. चार तास चाललेल्या बचाव मोहिमे दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी ५० जणांची सुटका केली. दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नऊ जणांना रुग्णालयात आणले त्यावेळी मृत घोषित करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान हॉटेलमधील प्रत्‍येक रुमची तपासणी करुन आत आणखी काही लोक आहेत का? याची पाहणी करत आहेत. हॉटेलमध्ये एकूण ४५ रुम असून त्‍यातील ४० रुम बुक आहेत.

नेमकी आग कशामुळे लागली..?
नेमकी आग कशामुळे लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहाटेच्यासमयी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली. त्यामुळे अनेकांना प्राण वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत बहुतांश मृत्यू गुदमरल्यामळे झाले आहेत.

LEAVE A REPLY

*