Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशतामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; ११ जणांचा मृत्यू

तामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; ११ जणांचा मृत्यू

चेन्नई l Chennai

तामिळनाडूमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. तामिळनाडूतील विरुधुनगरमध्ये आज (शुक्रवार) एका फटाक्यांच्या निर्मिती करणाऱ्या कारखान्यात

- Advertisement -

स्फोट होऊन भीषण आग लागली. या दूर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाल्याचे समजते आहे. सत्तुर नजिक अचानकुलम येथील कारखान्यात आग लागल्यानंतर येथे बरेच स्फोट झाले.

पंतप्रधानांनी या दूर्घटनेत प्रभावित झालेल्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवाला २ लाखांची तर जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत करण्याची पंतप्रधानांनी घोषणा केली आहे.

या दुर्घटनेबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले असून राज्य सरकाराला तातडीने मदतीचेआवाहन केले आहे.

तामिळनाडूत शिवाकाशी हे देशातलं सर्वात मोठं फटाके निर्मिती होणारं ठिकाण आहे. इथं जवळपास प्रत्येक घरात फटाक्यांची निर्मिती होते. शिवाकाशीमध्ये हजारांहून अधिक कारखाने असून वर्षाला इथल्या फटाके व्यवसायाची कोट्यवधींची उलाढाल होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या