Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रफटाक्यांची ठिणगी पडल्याने सोलापूर विमानतळ परिसरात लागली आग

फटाक्यांची ठिणगी पडल्याने सोलापूर विमानतळ परिसरात लागली आग

सोलापूर :काल रात्री काही हौशी मंडळीने सोलापूर विमानतळ परिसरात दिव्यांऐवजी फटाके फोडल्याने परिसरात भीषण आग लागली होती. अग्निशमन विभागाच्या जवानांनी अथक प्रयत्नाअंती आग आटोक्यात आणली.

फटाक्यांची ठिणगी तेथील गवतावर पडल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या होत्या. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवतहानी झालेली नाही.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि. ५) रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करा आणि मेणबत्ती-पणती उजळवा, असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर काल सर्व नागरिकांनी ९  वाजता दिवे बंद करुन मेणबत्ती-पणत्या पेटवल्या. पण याच दरम्यान सोलापूरमध्ये काही हुल्लडबाज तरुणांनी फटाके फोडले यामुळे फटाक्यांची ठिणगी गवतावर पडली आणि विमानतळ परिसरात आग लागली होती.

पंतप्रधान मोदींनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करुनही सोलापूरमध्ये काही हुल्लडबाज लोकांनी रस्त्यावर येत फटाके फोडल्याने यातून आजच्या दिवे लावा मोहिमेला गालबोट लागलेले दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या