Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कांदाचाळीला आग; १ हजार क्विंटल कांदा जळून खाक

Share

सटाणा | विशेष प्रतिनिधी

कांदा चाळीला आग लागून सुमारे 1 हजार क्विंटल पेक्षा जास्त कांदा जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत चाळ व त्यातील कांदा जळाल्याने शेतकऱ्याचे सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थिती त्यात अचानकपणे लाखो रुपयांचा फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जायखेडा येथील शेतकरी सोमनाथ ब्राह्मणकर यांनी कांदा लागवड करून कांदा चाळीत भरून ठेवला होता. जवळपास ४० ट्रॉली पेक्षा अधिक कांदा साठवून ठेवला. होता.

आज सकाळी चाळीत अचानक आग लागली आणि पाहता पाहता तिने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

मात्र तोप्रयन्त चाळ आणि त्यातील कांदा जळाला होता. लावला होता. आगीचे कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!