मिठसागरेत चाऱ्याचे वैरण जळून खाक

0
मिठसागरे | भानुदास कांदळकर यांच्या राहत्या घराजवळ ५ ते ६ ट्रॅक्टर वैरण दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत जनावरांच्या चाऱ्याचे वैरणजळून खाक झाले.

आगीचे लोळ बाहेर येत असताना घरातील लहान मुलाने पाहिल्यानंतर आरडाओरड केली त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे क्षणभरातच चाऱ्याच्या वैरणाची राख झाली. पावसाळ्यात घेतलेल्या पिकातून राहिलेला चारा शेतकरी जनावरांसाठी पुढचे आठ महिने वापरत असतो.

पाण्याची पातळी कमी झाली की चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होतो. यंदा सगळीकडे चांगला पाऊस झाला आहे. यंदा फारशी अडचण शेतकऱ्यांना भासणार नव्हती. परंतु अचानक ओढून आलेल्या संकटामुळे शेतकरी मात्र हैराण झाला आहे.

चाऱ्याच्या वैरणाला लागलेल्या आगीची माहिती जगदिश मारूती वाघ, लखण चतुर, ऊत्तम कासार, रामदास रंगनाथ कांदळकर, विठठल चतुर, मधुकर फापाळे, राजेंद्र कासार(पो.पा.), काशिनाथ कांदळकर, सोमनाथ कासार व छोटु वाघ यांनी सर्वांनी मेहनत करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

*