Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : देवळाली कॅम्प परिसरात बेकरीला आग; दहा लाखांचे नुकसान

Share

देवळाली कॅम्प | वार्ताहर

देवळाली कँम्प परिसरातील सिल्वाना बेकरी या दुकानास अचानक आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळी देवळाली छावणीच्या अग्निशमन विभागाने वेळीच धाव घेत आग विझवली. या आगीत जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे.

सकाळी 6 ते 7 च्या सुमरास ही घटना घडल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. अचानक आगीचे लोळ दिसत असल्यामुळे भीतीचे वातावरण होते.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आग आटोक्यात आणली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!