चाटोरी येथे आगीत ऊस जळून खाक तर द्राक्षबागेचे अतोनात नुकसान

0
सायखेडा (प्रतिनिधी) | निफाड तालुक्यातील चाटोरी येथे विजेचे स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत ऊस संपूर्णपणे जळून खाक झाला तर शेजारी असलेल्या द्राक्षबागेचे मोठे नुकसानझाले आहे.

विहिरिवर पाणी उपसा करण्यासाठी पंप ठेवण्यात आला आहे. येथे असणाऱ्या स्टार्टरजवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नारायण त्र्यंबक वरखेड़े यांच्या शेतातील गट 1418 मधील उस संपूर्णपणे जळून खाक झाला तर त्यांच्याच शेताच्या जवळ असलेल्या सोमनाथ लालजी खिंडे यांच्या शेतातील गट 1417 द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच विज वितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. वारंवार होणाऱ्या शॉर्टसर्किटमुळे शेतकरी त्रस्त झाले असून नुकसान भरपाई मिळावी तसेच हा तिढा कायमचा सोडवा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*