भाजप उद्योग आघाडीच्या प्रदीप पेशकारांचे कार्यालय जळून खाक

0
नवीन नाशिक | आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भाजप उद्योग आघाडीच्या प्रदिप पेशकार यांच्या संपर्क कार्यालयाला आग लागून पाच लाखाचे नुकसान झाले.

13 वावरे नगर खूटवडनगर रोड पहाटे 4.30 वा येथे आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन बंब तसेच शेजारील रहिवासी यांच्या मदतीने आग विझवली. सुमारे दोन तास आग विझवण्यासाठी लागले.

आगीमध्ये कपाटे, संगणक, कँबीन वायरींग तसेच उद्योगाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुमारे 5 लाख रू. नूकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*