Blog – एअर इंडिया : काल आणि आज

Blog – एअर इंडिया : काल आणि आज

केंद्र सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाला वाचवण्यासाठी त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने नवीन खरेदीदारासाठी कंपनीला आकर्षक करण्यासाठी सर्वोपतरी उपाय केले जात आहेत. एप्रिल 1932 मध्ये एअर इंडियाचा जन्म झाला होता. त्यावेळी उद्योगपती जेआरडी टाटा यांनी एअर इंडियाची स्थापना केली होती. मात्र त्यावेळी त्याचे नाव टाटा एअरलाइन्स असे होते.

टाटा एअरलाइन्सची सुरवात 1932 रोजी झाली होती. जेआरडी टाटा यांनी 1919 मध्ये पहिल्यांदा हौसेखातर विमान उडविले होते. तेव्हा ते केवळ 15 वर्षाचे हाते. या विमानात अन्य कोणताही प्रवासी नव्हता तर केवळ 25 किलो वजनाच्या चिठ्ठ्या होत्या. या चिठ्ठ्या लंडनहून इम्पिरियल एअरवेजकडून कराचीला आणल्या. त्यानंतर टाटा यांना वैमानिकाचा परवाना मिळाला.

टाटा सन्सने दोन लाख रुपये खर्चातून उभारलेल्या टाटा एअरलाइन्स कंपनीने 1933 मध्ये 155 प्रवासी आणि 11 टन टपालाची वाहतूक केली. टाटा एअरलाइन्सच्या विमानांनी एकाच वर्षात सुमारे एकूण 160,000 मैलापर्यंत उड्डाणे केली. या एअरलाइन्सच्या मदतीने नियमित रुपाने टपालांची देवाण घेवाण सुरू झाली. एका चिठ्ठीसाठी चार आणे मिळत होते.

सुरवातीच्या काळात टाटा एअरलाइन्सच्या विमानाची उड्डाणे हे मुंबईच्या जुहूतील एका मैदानातून होत असते. तेथेच असलेल्या एका मातीच्या घरात टाटा एअरलाइन्सचे कार्यालय होते. मैदानाचा रनवे म्हणून वापर केला जात होता. जेव्हा मुंबईत पाऊस व्हायचा तेव्हा या मैदानात पाणी भरायचे. दुसर्‍या महायुद्धानंतर पारतंत्र्यात असलेल्या भारताला विमान सेवा बहाल करण्यात आली. तेव्हा 29 जुलै 1946 रोजी टाटा एअरलाइन्स पब्लिक लिमीटेड कंपनी बनली आणि त्याचे नाव एअर इंडिया लिमिटेड असे करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये भारत सरकारने एअर इंडियात 49 टक्के भागिदारी घेतली.

सरकारने एअर इंडियाच्या खरेदीदारांसाठी प्राथमिक कागदपत्रे जारी केले आहेत. याबाबत कागदपत्रे जमा करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. निर्गुंतवणूकीच्या धोरणानुसार सरकार एअर इंडियाची स्वस्त विमान सेवा कंपनी एअर इंडिया एक्स्प्रेसचा संपूर्ण शंभर टक्के हिस्सा विकणार आहे. तसेच कर्मचार्‍यांना कर्मचारी शेअर पर्याय योजनातंर्गत शेअर दिले जाणार आहेत. निर्गुंतवणूकीच्या धोरणानुसार कंपनी कर्मचार्‍यांना एकूण तीन टक्के शेअर देण्याचा प्रस्ताव मांडणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com