Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात होणार मेट्रोचे जाळे

नाशिक शहरात होणार मेट्रोचे जाळे

नवी दिल्ली

भारतामध्ये मेट्रो आणि बस वाहतुकीचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी विशेष तरतूद आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील वेगवेगळ्या भागांमधील शहरांसाठी मेट्रोचे काम करण्याच्या दृष्टीने निधी कशापद्धतीने देण्यात येणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये नाशिक व नागपूरचा समावेश आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं जाळं उभारण्यासाठी पाच हजार ९०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचं निर्मला यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही मेट्रोचं काम होणार असून यासाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा निर्मला यांनी केली आहे.

दक्षिणेमधील बंगळुरु आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांनाही मेट्रोची सेवा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. बंगळुरुमधील मेट्रोचा विस्तार करण्यासाठी १४ हजार ७८८ रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या पैशांमधून बंगळुरु मेट्रोचं जाळं ५८.१९ किलोमीटरने वाढवण्यात येणार आहे. याचप्रमाणे चेन्नईमध्येही मेट्रोच्या दुसऱ्या मार्गाचं काम केलं जाणार असून हा मार्ग ११८.९ किलोमीटरचा असणार आहे. यासाठी ६३ हजार २४० रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या