Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

मंत्रिपद नको! अरुण जेटलींचे मोदींना पत्र; मोदींचे उत्तर बघून तुम्हालाही अभिमान वाटेल

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

मोदी सरकारच्या काळात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाच वर्षे अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतले. विरोधकांच्या प्रश्नांही त्यांनी ठामपणे उत्तरे दिली. भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक मोठे पावले उचलायला लावणाऱ्या जेटलींनी मात्र २०१९ च्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान नको असल्याचे एक पत्र मोदींना पाठवले आहे. तब्बेतीच्या कारणास्तव आरामाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जेटलींनी केलेल्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी यांनी रिप्लाय करत सांगितले की, सर्वात आधी तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.  तुमच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था खूप चांगल्या मार्गाने पुढे गेली. तुमची कारकीर्द न विसरणारी आहे. तुम्ही भारताला जीएसटी आणि आयबीसीच्या माध्यमातून सजग बनवले. देशाची वाटचाल जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेकडे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी उद्या होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. यामुळे जेटली यांनी ट्विटर खात्यावरून एक पत्र शेअर केले आहे.

यामध्ये मंत्रिपद नको असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तब्बेतीची काळजी घेण्याचे सांगितले आहे. सध्या आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावे लागत आहे. यातून बाहेर येण्यासाठी मला पुरेसा वेळ हवा आहे.

‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली हा माझा सन्मान समजतो असेही जेटली यांनी या पत्रात म्हटले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून जेटली हे किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. त्याशिवाय, त्यांना कर्करोगाचेही निदान झाल्यामुळे त्यांची तब्बेत अधिकच खालावली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे जेटली यांना अर्थसंकल्प देखील सादर करता आला नव्हता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!