Type to search

Filmfare Awards 2019: आलिया रणबीरला म्हणाली, ‘I Love You ‘

मुख्य बातम्या हिट-चाट

Filmfare Awards 2019: आलिया रणबीरला म्हणाली, ‘I Love You ‘

Share
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यातले नाते दिवसोंदिवस बहरत चालले आहे. तर आलियाने संपूर्ण जगा समोर आपल्या नात्याचा स्वीकार केला आहे. 64 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या वेळेस आलिया रणबीरला ‘आय लव्ह यू’ म्हणाली आहे.

शनिवारी पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आलियाला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ‘राझी’ चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे आलिया सध्या तिच्या ‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे.

यावेळीआलिया म्हणाली, “मेघना, माझ्यासाठी तूच खरी हिरो आहेस. माझी राझी आहे. या चित्रपटासाठी तू प्रचंड मेहनत घेतलीस आणि विकी शिवाय तर हा चित्रपट कधी पूर्ण झालाच नसता. इतकंच नाही तर करण जोहर आणि माझे वडील तुम्ही माझे मेंटर आहात. माझ्या यशाच्या वाटचालीत मला साथ दिल्यामुळे तुमचे मनापासून आभार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे हा दिवस फक्त माझा आणि माझ्या खास व्यक्तीचा आहे, आय लव्ह यू…,”असं आलिया यावेळी म्हणाली.

वर्षाखेरीस आलिया आणि रणबीरचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटात आलिया – रणबीरची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी साखपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!